मारुती सुझुकी जिमनी 5 डोअर लवकरच चाहत्यांच्या भेटीला

Maruti Suzuki Jimny – देशातील आघाडीच्या कार उत्पादकांपैकी एक असलेली मारुती सुझुकी ( Maruti Suzuki ) 2023 मध्ये ऑटो एक्सपोमध्ये 5-डोअर (Maruti Suzuki Jimny 5 Door) SUV जिमनी कार लवकरचं चाहत्यांच्या भेटली येणार आहे. ज्याची बुकिंगही सुरू झाली असून 5000 कार बुक सुद्धा झाल्या आहेत. ही कार 2023 च्या मे महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे.

मारुती सुझुकी जिमनी 5-डोअर (Maruti Suzuki Jimny 5 Door) ही 3-डोअर (Maruti Suzuki Jimny 3 Door) मॉडेलची विस्तारित आवृत्ती आहे. मारुती सुझुकी जिमनी ही 3- डोअर मॉडेलपेक्षा 340mm अधिक व्हीलबेस आहे. SUV ची लांबी 3,985mm, रुंदी 1,645mm आणि उंची 1,720mm आहे. त्याचे ग्राउंड क्लीयरन्स 210mm इतका आहे.

मारुती सुझुकी जिमनी 3-डोअर (Maruti Suzuki Jimny 3 Door)
मारुती सुझुकी जिमनी 5-डोअर (Maruti Suzuki Jimny 5 Door)
मारुती सुझुकी जिमनीच्या (Maruti Suzuki Jimny 5 Door) वैशिष्ट्यांचा विचार केल्यास, जिमनीमध्ये इलेक्ट्रिकली रिट्रॅक्टेबल आणि अॅडजस्टेबल ORVM, ऑटोमॅटिक हेडलँप, वॉशर, सुसज्ज एलईडी हेडलॅम्प,टेलगेटला लावलेले स्पेअर व्हील आणि HD डिस्प्लेसह 9-इंच स्मार्ट प्ले प्रो+ इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. सहा एअरबॅग्ज, ब्रेक लिमिटेड स्लिप डिफरेंशियल, साउंड सिस्टम, हिल होल्ड असिस्टसह ईएसपी, हिल डिसेंट कंट्रोल, रीअरव्ह्यू कॅमेरा आणि ईबीडीसह एबीएस देखील आहेत.

 
Dnyaneshwar: