बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ताची मुलगी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता घटस्फोटाच्या 4 वर्षानंतर लग्नबंधनात अडकली आहे. मसाबाने तिचा प्रियकर आणि अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत एक इंटिमेट लग्न केले आहे, ज्यामध्ये फक्त तिचे कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. मसाबाने आता सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
मसाबाबद्दल ही एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. तिचा हाऊस ऑफ मसाबा नावाचा एक अतिशय प्रसिद्ध ब्रँड आहे. याशिवाय मसाबा काही काळापूर्वी नेटफ्लिक्स शो 'मसाबा मसाबा'मध्ये दिसली होती. मसाबाने 2015 मध्ये सत्यदीप मिश्रा याच्या आधी मधु मंटेनाशी लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या 4 वर्षानंतर म्हणजेच 2019 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
मसाबाची सत्यदीप मिश्रासोबत पहिली भेट त्यांचा नेटफ्लिक्स शो 'मसाबा मसाबा'च्या शूटिंगदरम्यान झाली होती. सत्यदीप मिश्रा याचेही हे दुसरे लग्न आहे. मसाबाच्या आधी सत्यदीपने 2009 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीसोबत लग्न केले होते. त्यांचाही लग्नाच्या 4 वर्षांनंतर घटस्फोट झाला. सत्यदीप मिश्राने 'नो वन किल्ड जेसिका' मधून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्याने 'बॉम्बे वेलवेट', 'चिल्लर पार्टी', 'फोबिया', 'विक्रम वेधा' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
विशेष म्हणजे लेकीच्या लग्नात ज्येष्ठ क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड्सदेखील उपस्थित होते. लेकीच्या लग्नाच्या निमित्ताने नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स अनेक वर्षानंतर एकत्र आलेले दिसून आले.