तुर्कस्तान : (Turkiye Earthqueak gaziantep) तुर्कस्तानसाठी आणि सिरीया (Syria Earthqueak) या देशांसाठी आजचा (सोमवार, ६ जानेवारी) दिवस काळा दिवस ठरला आहे. आज दोन वेळा या देशांत भूकंपाचे (Earthqueak In Turkiye gaziantep) मोठे धक्के बसले आहेत. भूकंपामुळे आतापर्यंत १३०० लोकांचा मृत्यू झाला आहे तर 5,३८० लोक जखमी झाल्याची माहिती आहे. भूकंपात जवळजवळ ३००० इमारती जमीनदोस्त झाल्या असून २५०० जवळ लोकांना ढिगार्यातून बाहेर काढण्यात आले आहे. अजूनही हजारो लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मोठ्या प्रमाणावर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. अशी माहिती आहे. (Earthqueak news In Turkiye gaziantep, Lebanon And Syria)
तुर्कस्तानमधील स्थानिक वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार सोमवारी पहाटे झालेल्या भूकंपानंतर सुमारे 12 तासांनी तुर्कस्तानमध्ये संध्याकाळी दुसऱ्या भूकंपाने लोक हादरले. (Turkiye Earthqueak) तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन (Recep Tayyip Erdoğan) यांनी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक घेऊन भूकंपग्रस्तांना शक्य ती सर्व मदत देऊ केल्याची माहिती आहे. (Turkiye gaziantep, Lebanon)
तुर्कस्तानमध्ये सोमवारी पहाटे ४.१५ च्या सुमारास भूकंप झाला. सीरियाच्या सीमेपासून केवळ ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या गाझिआनटेप भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सीरियातही भूकंपाचा मोठा परिणाम झाला. सीरियातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. तुर्कस्तान आणि सीरिया या दोन्ही देशांना ६ वेळा जोरदार भूकंपाचे धक्के बसले.