उल्हासनगरमध्ये दुर्दैवी घटना! सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट, कामगारांच्या जागीच चिंधड्या

उल्हासनगर : (Century Rayon Blast News) शहरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत गंभीर दुर्घटना झाली आहे. यात तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. कंपनीत काम सुरू असतानाच बॉयलर फुटल्याने ही घटना घडली. यात 5 कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

उल्हासनगरमधील शहाडमध्ये सेंच्युरी रेयॉन कंपनी आहे. या कंपनीत धागे बनवले जातात. त्याचबरोबर केमिकल कंपनीही आहे. शनिवारी (23 सप्टेंबर) कंपनी काम सुरू होतं. सकाळी 11 वाजता अचानक स्फोट झाला. बॉयलर फुटल्याने हा स्फोट झाला.

सेंच्युरी रेयॉन कंपनी स्फोट : मृत्यू झालेल्यांची नावे काय?
हा स्फोट इतका भीषण होता की, 3 कामगार जागीच ठार झाले, तर काहीजण जखमी झाले. शैलेश यादव आणि लाला श्रीवास्तव अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत.

या स्फोटात इतर काही कामगार जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. स्फोटाची तीव्रता इतकी भयंकर कामगारांच्या शरीराच्या चिंधड्या उडल्या. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Prakash Harale: