मुंबई | MC Stan – ‘बिग बाॅस 16’ (Bigg Boss 16) चा विजेता एमसी स्टॅन (MC Stan) सध्या चांगलाच चर्चेत आहे. तो बिग बाॅस या शोपासून प्रसिद्धीझोतात आला आहे. आज त्याचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत. तसंच गेल्या काही दिवसांपासून एमसी स्टॅन ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi) या शोमध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण आता स्टॅनने या शोची ऑफर नाकारली आहे. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत.
लवकरच ‘खतरों के खिलाडी’ चा 13 वा सीझन सुरू होणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये शिव ठाकरे, प्रियांका चौधरी, एमसी स्टॅन सहभागी होणार असल्याचं म्हटलं जातंय. पण आता स्टॅनने या शोला नकार दिल्याचं समोर आलं आहे. तसंच त्यानं नकार देण्यामागचं कारण देखील सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमसी स्टॅनने ‘खतरों के खिलाडी’ शोची ऑफर नाकारली आहे. या शोच्या निर्मात्यांनी स्टॅनला या कार्यक्रमासाठी मोठ्या मानधनाची ऑफर दिली होती. पण तरी देखील स्टॅनने ही ऑफर नाकारली आहे. सध्या त्याला त्याच्या नव्या गाण्यांवर काम करायचं आहे, त्यामुळे त्यानं या कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, ‘खतरों के खिलाडी 13’ हा शो 17 जुलै पासून सुरू होणार असल्याचं बोललं जातंय. पण याबाबत शोच्या निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तसंच आता प्रेक्षकांना या शोची चांगलीच उत्सुकता लागली आहे.