एमसी स्टॅनची तुलना थेट सिद्धार्थ शुक्लाशी; अर्पिता खानच्या ईद पार्टीत एमसी स्टॅन झाला ट्रोल

मुंबई | शनिवारी देशभरात धूमधडाक्यात ईद साजरी करण्यात आली. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही ईदचा उत्साह पहायला मिळाला. ईदच्या निमित्ताने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी शानदार पार्ट्यांचं आयोजन करतात. सलमान खानची बहीण अर्पिता खानसुद्धा दरवर्षी ईदच्या पार्टीचं आयोजन करते. या पार्टीला बॉलिवूड इंडस्ट्रीतील बऱ्याच सेलिब्रिटींनि हजेरी लावली होती. रेड कार्पेटवरील त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

अर्पिता खानच्या ईद पार्टीत एमसी स्टॅन हा शर्ट, जीन्स, कॅप आणि व्हाइट शूज अशा लूकमध्ये आला होता. तो रेड कार्पेटवर येताच पापाराझींनी फोटो आणि व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. पापाराझींनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओला अवघ्या काही तासांत लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत.

या व्हिडीओवर कमेंट करत काहींनी एमसी स्टॅनच्या लूक आणि ॲटिट्यूडचं कौतुक केलं. तर काहींनी त्याच्यावर टीका केली. ‘असं वाटतंय बांबूवर कोणीतरी कपडे सुकवले आहेत’, अशा शब्दांत एकाने खिल्ली उडवली. तर ‘कुठे सिद्धार्थ शुक्ला आणि कुठे हा. लोक म्हणतील की चाळीतून पुढे येऊन हा मुलगा विजेता ठरला आहे. पण चाळीत राहणारा प्रत्येक माणूस हा बिचाराच असतो असं नाही. त्यामुळे त्याला सहानुभूती देणं बंद करा’, असं दुसऱ्याने म्हटलंय.

Dnyaneshwar: