‘मास्टर ब्लास्टर’ला 50 व्या वाढदिवसानिमित्त MCA कडून अनोखं गिफ्ट

मुंबई | Sachin Tendulkar Statue On Wankhede Stadium – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला त्याच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त MCA कडून अनोखं गिफ्ट देण्यात येणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सचिन तेंडुलकरचा भव्य पुतळा (Sachin Tendulkar) उभारण्यात येणार आहे. याबाबत एमसीएकडून (Mumbai Cricket Association) अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तसंच वानखेडे स्टेडियमवरील सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं काम चार ते पाच महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती एमसीएनं दिली आहे.

एमसीएनं दिलेल्या माहितीनुसार, सचिन तेंडुलकरच्या पुतळ्यासाठी (Sachin Tendulkar Statue) जागा ठरवण्यात आली आहे. सचिन तेंडुलकरचा पुतळा एमसीए लॉन्ज (MCA Lounge) समोरच्या जागेवर उभारण्यात येईल. वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात येणाऱ्या या पुतळ्याचं अनावरण वर्ल्ड कपच्या (World Cup) दरम्यान केलं जाणार आहे.

याबाबत एमसीएच्या अध्यक्षांनी अधिक माहिती देत सांगितलं की, सचिन तेंडुलकरचा 50 वा वाढदिवस आहे. ते भारतरत्न आहेत. त्यामुळे त्याच्या पन्नासाव्या वर्षाचे औचित्यसाधून MCAनं खास गिफ्ट देण्यासाठी हा प्रयत्न केला आहे. सचिनचा पुतळा कशाप्रकारे बसवायचा हे आम्ही आर्किटेकशी चर्चा करून ठरवणार आहोत, असंही त्यांनं सांगितलं.

दरम्यान, एमसीएकडून मिळणाऱ्या या खास गिफ्टबाबत सचिन तेंडूलकरनं प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “वानखेडे मैदानातून माझा प्रवास सुरू झाला आहे. मी वयाच्या बाराव्या वर्षापासून मुंबईकडून क्रिकेट खेळतोय. शारदाश्रम शाळेकडून खेळताना मी माझ्या एका सीनियर टीमला सपोर्ट करण्यासाठी मी या स्टेडियमवर एकदा आलो होतो. तर दुसरीकडे आचरेकर सरांनी माझी मॅच शिवाजी पार्क मैदानावर ठेवली होती. त्यावेळी आचरेकर सर मला खूप ओरडले होते. ते माझ्या मनाला खूप लागलं आणि तेव्हापासून माझी जर्नी सुरू झाली. त्यानंतर मी या मैदानावर रणजी ट्रॉफी खेळलो. तसंच क्रिकेटमधला सगळ्यात मोठा दिवस म्हणजे वर्ल्डकप ज्यावेळेस आम्ही 2011 ला जिंकलो, तो याच मैदानावर. हा माझ्यासाठी क्रिकेटमधला सगळ्यात मोठा दिवस होता. इथेच माझी रिटायरमेंट सुद्धा झाली. मला असोसिएशन एवढा मोठा मान देतंय, हे माझ्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट आहे.”

Sumitra nalawade: