‘मै भी राहुल गांधी’ ट्रेन्ड कार्यकर्त्यांनी चालवावा; डॉ. विश्वजीत कदम

पुणे | पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेल्या मोदी सरकारने सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न चालविला आहे त्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी मै भी राहुल गांधी हा ट्रेन्ड चालवावा असे आवाहान ना. डॉ विश्वजीत कदम यानी केले आहे.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे तीव्र आंदोलन केले. महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आ. प्रणीती शिंदे, आ. राजेश राठोड, आ. लहू कानडे, आ. जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन पार पडले.

यावेळी डॉ. कदम म्हणाले की,‘‘केंद्रातील मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत असून, लोकशाही धोक्यात आणलीच आहे; परंतु अराजकतेच्या दिशेने या देशाची वाटचाल चालू झाली आहे. याला केवळ मोदी व शहा जबाबदार आहेत. केंद्र व राज्य यांचे अत्यंत चांगले असलेले संबंध गेल्या अडीच वर्षांपासून मविआच्या स्थापनेनंतर मोदीजी फक्त सुडाचे राजकारण करीत आहे.

काँग्रेस कार्यकर्त्याने रस्त्यावर उतरून या सर्व गोष्टी जनतेपर्यंत मांडल्या पाहिजेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी या सर्व गोष्टी संसदेमध्ये व बाहेर लोकांपुढे सतत मांडत आहेत, म्हणूनच त्यांचा आवाज दाबण्यासाठी ईडीची चौकशी लावून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे.

Dnyaneshwar: