मुंबई | Shahid Kapoor and Mira Rajput | बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध जोडीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ही जोडी म्हणजे शाहिद कपूर(Shahid Kapoor) आणि मीरा राजपूत. या जोडीबद्दल सांगायचं झाल तर शाहिद कपूरने २०१५ मध्ये मीराशी लग्न केलं आहे. तर या जोडप्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. मीरा आणि शाहिद अनेक जाहिराती, मुलाखती आणि फॅशन शोमध्येही एकत्र दिसतात. तसचं हे दोघं त्यांच्यातलं बॉण्डिंग सोशल मीडियावरून जगाला दाखवत असतात. पण नुकताच मीराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शाहिदमधील ‘कबीर सिंग’ जागा झाल्याचं पाहायला मिळत आहे.
तर या व्हिडीओमध्ये मीरा पियानोवर शांत वातावरणात घरात बसून ‘तुझे कितना चाहने लगे’ हे गाणं वाजवताना दिसत आहे. अत्यंत मधूर आवाजात ती हे गाणं वाजवत असतानाच पाठीमागून शाहिद अचानक तिच्या मागे येतो आणि असं काही करतो जे पाहून मीराला कबीर सिंगची आठवण होते. असा हा त्यांचा थोडा रोमँटिक असा व्हिडीओ शेअर करताना मीराने कॅप्शनमध्ये लिहिलं की, “खरा कबीर सिंग, तू कृपया शांत होशील का?”. तर ती पियानो वाजवत असतानाच जेव्हा शाहिद मागून आला आणि कबीर सिंग सारख्या आवाजात मीराशी बोलू लागला. इतकंच नव्हे तर त्याने तिला मागून येऊन घट्ट मिठी मारताना पहायला मिळत आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मीरा पियानोचा सराव करत असून तिने सोशल मीडियावर ‘कबीर सिंग’ चित्रपटातील ‘तुझे कितने चाहने लगे’ या गाण्याचं कव्हर वाजवताना दिसली. तर चाहते या व्हिडीओवर कमेंट करत त्यांच्यातलं बॉण्डिंग आणि मीराच्या कलेबद्दल आनंद व्यक्त करत आहेत.