पुणे : (Meeting Of Parth Pawar And Shambhuraj Desai) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार नेहमीचं आपल्या पक्षाविरोधी वेगवेगळ्या भुमिकांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपुर्वीच त्यांनी नागपुरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान हजेरी लावल्याने चर्चेत आले होते.
दरम्यान, आज पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. कारण पार्थ पवार हे शिंदे गटाचे नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. मागील अनेक दिवसांपासून पार्थ पवार पक्षात देखील पाहिजे तेवढे सक्रिय दिसत नाहीत. त्यामुळे ते शिंदे गटात तर जाणार नाहीत ना? अशा शंकेला वाव मिळाला आहे. भेटीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.
तर दुसऱ्या बाजूला पुण्याच्या माजी महापौर भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधन झाले. अन् बुधार दि. 18 जानेवारी रोजी या जागांसाठी पोटनिवडणुका जाहिर झाल्या आहेत. त्यामुळे या पार्श्वभुमीवर पार्थ पवार आत्तापासूनच काही जुळवाजुळव करत नाहीत ना हि देखील शंका निर्माण केली जात आहे. भेटीचे कारण जरी गुलदस्त्यात असलं तरी माध्यमांनी त्यांना विचारलं असता ही वैयक्तिक भेट असल्याचे त्यांनी कारण दिलं आहे.