सांगलीच्या माधवनगर ग्रा.प. महिला सदस्याचे सदस्यत्व रद्द; जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई

सांगली | सांगली जिल्ह्यातील (Sangli News) माधवनगर ग्रामपंचायत (Madhavnagar Gram Panchayat) येथील सदस्या पुनम गजानन होनवार (Poonam Gajanan Honwar) यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी (Collector Dr. Raja Dayanidhi) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे शिवाजी डोंगरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

तिसरे अपत्य असल्याची माहिती लपविल्याबद्दल पूनम होनवार यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व (Gram Panchayat Membership) रद्द केले आहे. माधवनगर ग्रामपंचायतच्या वाॅर्ड क्रमांक 5 मधून पूनम होनवार या डोंगरे गटाच्या पॅनेलमधून विजयी झाल्या होत्या. त्यांच्या विरोधात याच प्रभागातील रेखा शेंडे (Rekha Shende) यांनी निवडणूक लढविली होती. निकालानंतर शेंडे यांनी पुनम होनवार यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 14 (1) मधील खंड (ज-1) नुसार 3 अपत्य असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केली होती.

या तक्रार अर्जावर जवळपास 3 सुनावण्या पार पडल्या. रेखा शेंडे यांनी सबळ कागदपत्रे सादर केली होती. याबाबतच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी अखेर पुनम होनवार यांना अपात्र केले आहे.

अपीलासाठी 15 दिवसांची मुदत असणार

पुनम होनवार यांना या निकालाविरोधात पुणे विभागीय आयुक्तांकडे (Pune Divisional Commissioner) अपील करता येणार आहे. त्यासाठी त्यांना पंधरा दिवसांची मुदत जिल्हाधिकारी दयानिधी यांनी आदेशाद्वारे दिली आहे.

admin: