‘मेट्रोमॅन’ शशिकांत लिमये यांचे निधन

पुणे : गुरुवारी रात्री पुणे, पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार शशिकांत लिमये यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. मेट्रो प्रकल्पासाठी आग्रही भूमिका मांडणारे लिमये हे ७१ वर्षाचे होते. तसंच त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, आणि भाऊ असा परिवार आहे. याचबरोबर लिमये यांची भारतीय रेल्वेतील तज्ज्ञ अधिकारी म्हणूनही ख्याती होती. त्यांनी पुणे भागातील मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारासाठी गेल्या दोन दिवसांपूर्वीच बैठक घेण्यात आली होती यासाठी ते उपस्थित होते. याबाबतले पुण्याभोवती लोहमार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी त्यांनी आराखडेही तयार केले आहेत.

तसंच पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी 2012 पासून ते आग्रही होते. तर 2014 मध्ये त्यांना महामेट्रोद्वारे मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं. पुणे मेट्रोचा आराखडा तयार करण्यात लिमये यांची महत्त्वाची भूमिका होती.कधी जर मेट्रोबद्दल काही गैरसमज निर्माण झाले तर ते दूर करण्यात ते कायम अग्रेसर असत. त्याचं काही शिक्षण पुण्यामध्येच पूर्ण झालं. तर मुंबई आयआयटीमधून त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते भारतीय रेल्वेत दाखल झाले. काही काळ त्यांनी खाजगी कंम्पनीचे सल्लागार म्हणूनही काम पाहिले.

Nilam: