मुंबई : CNG Rates Collapse मागील अनेक दिवसांपासून नागरिक महागाईने त्रस्त आहेत. यात पेट्रोल, डीझेल आणि सीएनजीच्या किमतीही आभाळाला भिडलेल्या आहेत. अशात एक आनंदाची बातमी मुंबईकरांसाठी (MGL, Mumbai CNG Rates) समोर आली आहे. फेब्रुवारी महिना मुंबईकरांसाठी आनंदाचा ठरणार आहे. कारण मुंबईमध्ये सीएनजीच्या दारात मोठी कपात करण्यात आली आहे. (MGL CNG Rates Collapse In Mumbai)
मुंबईत महानगर गॅस लिमिटेडने (MGL, Mumbai Mahanagar Gas Limited, CNG Rates) प्रतिकिलो तब्बल २.५ रुपयांनी सीएनजी स्वस्त होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. ३१ जानेवारीला मध्यरात्रीपासून हे दर लागू होणार आहेत. MGL ने सांगितले की ते CNG च्या किमती रु.2.50/Kg ने कमी करत आहेत. या निर्णयानंतर, 31 जानेवारी 2023 च्या मध्यरात्रीपासून सीएनजीची किंमत आता रु. 87.00/किलो होईल. पूर्वी CNGची किंमत रु. 89.50/किलो होती.