अनेकवर्ष टीम इंडियाचा कॅप्टन राहिलेला किंग विराट कोहली सध्या खराब फॉर्म मध्ये दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून आऊट ऑफ फॉर्म आहे. जवळपास त्याला गेले तीन वर्ष कोणत्याही फॉर्मेटमध्ये शतक ठोकता आलेले नाही. तसेच, सध्या सुरु असलेल्या आयपीएल 15 सीझनमध्येती तो फ्लॉप ठरला आहे. त्याची निराशाजनक कामगिरीमुळे क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज त्याला सल्ला देताना दिसत आहेत. अनेक जण त्याला क्रिकेटमधून सन्यास घेण्याचा सल्ला देत आहेत मात्र आता तर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने विराट कोहलीला खास सल्ला दिला आहे. त्याने कोहलीला १० वर्षांपूर्वी विराट होण्याचा सल्ला दिला आहे.
एका अमुलाखतीत तो म्हणाला, फाफ डुप्लेसिसने विराट कोहलीशी चर्चा केली असेल. आणि या चर्चेदरम्यान 10 वर्ष मागे जाण्याचा विराटला सल्ला दिला असेल. जेव्हा लग्न झाले नव्हते, एका मुलीचे वडील बनले नव्हते, तेव्हा प्रत्येक बॉलची संधी साधण्यासाठी मैदानावर विराट सज्ज असायचा. तु तुझे वय विसर आणि हेदेखील विसर की तु आत्तापर्यंत काय काय केलसं. असा सल्ला वॉनने यावेळी विराटला दिला.