नवी दिल्ली | ओला (Ola), अॅमेझॉन (Amazon), ट्विटर (Twitter), मेटा (Meta) यांसह आणखी एक मोठी कंपनी कर्मचारी कपात करणार आहे. जगातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने (Microsoft) 10,000 कर्मचार्यांची कपात करणार असल्याची माहिती मिळत आहे. कंपनीने आपल्या नियामक फायलिंगमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. “या कर्मचाऱ्यांना कंपनीने तात्काळ काम थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आर्थिक परिस्थिती आणि ग्राहकांच्या बदलत्या पसंतीमुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली जात असल्याचे कंपनीने सांगितले.
याचा अर्थ मायक्रोसॉफ्टमध्ये (Microsoft) आजपासून सुरू होणाऱ्या कपातीचा 11,000 कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्टमधील कर्मचारी कपातीचा प्रभाव अभियांत्रिकी विभागात होणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यावर परिणाम होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मायक्रोसॉफ्टमध्ये अमेरिकन टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये कर्मचारी कपात पाहायला मिळणार आहे.
मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, “ते आपल्या हार्डवेअर पोर्टफोलिओमध्ये देखील बदल करणार आहेत आणि भाडेतत्त्वावर दिलेली कार्यालये एकत्र करणार आहेत. म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट आहे की कंपनी आपली अनेक कार्यालये बंद करण्याची तयारी करत आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला (Satya Nadella) म्हणाले की, ही कपात आमच्या एकूण कर्मचार्यांपैकी 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. आम्ही काही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची कपात करत असलो तरी महत्त्वाच्या धोरणात्मक क्षेत्रात आम्ही भरती करणे सुरू ठेवू. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून नवीन कॉम्प्युटर प्लॅटफॉर्म तयार करण्यावर भर दिला आहे असे ते म्हणाले.