अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यापासून डोनाल्ड ट्रम्प ॲक्शन मोडमध्ये काम करत आहेत. ट्रम्प यांनी चीनला कोंडीत पकडण्याची योजना सुरू केल्याचे चित्र आता दिसत आहे. याचे कारण म्हणजे ट्रम्प यांनी त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून रिपब्लिकन प्रतिनिधी माइक वॉल्ट्ज यांची निवड केली आहे. अशी माहिती वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’ने दिली आहे. वॉल्ट्झ हे यूएस आर्मीचे निवृत्त ग्रीन बेरेट आहेत, जे चीनचे प्रमुख टीकाकार आहेत. वॉल्ट्ज नॅशनल गार्डमध्ये कर्नल म्हणून कार्यरत आहेत.
डोनाल्ड ट्रम्पचे एकनिष्ठ असलेले वॉल्ट्झ यांनी नॅशनल गार्डमध्ये कर्नल म्हणूनही काम केले आहे. ते आशिया-पॅसिफिकमधील चिनी क्रियाकलापांचे कठोर टीकाकार आहेत. त्यांनी या प्रदेशातील संभाव्य संघर्षासाठी अमेरिकेने तयारी करण्याची गरज व्यक्त केली आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे एक शक्तिशाली पद आहे, ज्याला सिनेटच्या पुष्टीकरणाची आवश्यकता नाही. प्रमुख राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर ट्रम्प यांना माहिती देण्यासाठी आणि विविध एजन्सींशी समन्वय साधण्यासाठी वॉल्ट्ज जबाबदार असतील.