उद्धव ठाकरेंचे ‘राईट हँड’ नार्वेकर भाजपच्या वाटेवर? अमित शहांना दिल्या शुभेच्छा; चर्चेला उधाण!

मुंबई : (Milind Narvekar On Amit Shah) मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अपेक्स काऊन्सिलच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दणदणीत विजय मिळवला. मैदान मारुन काही तास उलटत नाहीत, तोच नार्वेकरांनी थेट भाजपश्रेष्ठींना केलेल्या एका ट्वीटची चर्चा रंगली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उद्देशून ट्वीट केलं आहे.

निमित्त आहे ते शाहांच्या वाढदिवसाचं. परंतु ठाकरे-भाजप वादाच्या पार्श्वभूमीवर “माननीय गृहमंत्री श्री अमित शाह जी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! देव करोला तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो” अशा आशयाचं इंग्रजी ट्वीट मिलिंद नार्वेकर यांनी केलं आहे.

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि सर्वात विश्वासू मानले जातात. उद्धव ठाकरे हे वारंवार भाजपवर तोफ डागताना दिसतात, तसंच ‘मातोश्री’वरील बंद खोलीतील चर्चांवरुन अमित शाहांना बोल लावताना दिसतात, असं असतानाही ठाकरेंचे ‘राईट हँड’ नार्वेकर मात्र ट्विटरवरुन त्यांना जाहीर शुभेच्छा दत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Prakash Harale: