शिंदे गटात जाण्याची चर्चा असतानाच मिलिंद नार्वेकरांचं सूचक ट्विट; म्हणाले…

मुंबई | Milind Narvekar – सध्या राज्यात ‘खरी शिवसेना कुणाची’ यावरून शिंदे गट (Shinde Group) आणि उद्धव ठाकरेंमध्ये (Uddhav Thackeray) वाद सुरू आहे. दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. याच दरम्यान शिंदे गट आणि शिवसेनेत (Shivsena) मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश देखील होत आहेत. त्यातच उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता मिलिंद नार्वेकर यांनी याबाबत सूचक ट्विट केलं आहे.

मिलिंद नार्वेकरांनी ‘शिवतीर्था’वरील दसरा मेळाव्याच्या तयारीची पहाणी केली. काल रात्री साडेदहा वाजता नार्वेकर ‘शिवतीर्था’वर पोहोचले आणि कामाची पहाणी करताना दिसले. त्यांच्या या भेटीचे काही फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. ज्या ठिकाणी मंच उभारला जातोय तिथे उभे राहून नार्वेकर कामाची पहाणी करताना दिसत आहेत. नार्वेकर यांनी ट्विटरवरुन काही फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची ‘शिवतीर्था’वर जय्यत तयारी सुरू असून काल रात्री या कामाची पाहणी केली. तसंच येथे असलेल्या बंगला क्लबच्या दुर्गोत्सवास भेट दिली व माँ दुर्गेचे दर्शन घेतले”, असं नार्वेकर म्हणाले.

दरम्यान, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी धुळ्यातील एका सभेत बोलताना खळबळजनक दावा केला होता. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे सेवक चम्पासिंग थापा यांच्यानंतर उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) देखील शिंदे गटात सहभागी होतील असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

Sumitra nalawade: