दुधात ‘हे’ पदार्थ मिसळून प्या, होतील जबरदस्त फायदे!

मुंबई | आपल्याला अनेक औषधी वनस्पती माहिती आहेत, मात्र जर त्या दुधात (Milk) मिसळल्या तर त्याचे फायदे दुप्पट होतात याची अनेकांना कल्पना नसते. आयुर्वेदात म्हटल्याप्रमाणे, औषधी वनस्पती कमकुवत रोगप्रतिकारशक्ती, शरीराच्या विविध वेदना आणि स्नायूंचा थकवा यांसारख्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या वनस्पती आहेत ज्या दुधात मिसळल्या की त्याचा जबरदस्त फायदा होतो.

हळद आणि दूध

हळद ही एक अशी औषधी वनस्पती आहे जी दुधात मिसळल्यास शरीरातील दुखणी तसंच जखमा दूर होतात. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते जे अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करतं. हे कर्क्यूमिन अँटीइफ्लामेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे. ज्यामुळे वेदना कमी करण्यास, स्नायूंना आराम करण्यास आणि रोगांपासून बरे होण्यास मदत करते.

दूध आणि अश्वगंधा

अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी शरीरासाठी फायदेशीर असते. अश्वगंधा वनस्पती दुधात मिसळून पिल्यास ताण-तणाव कमी होतो आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. अश्वगंधाचा खास गुण म्हणजे शरीराला आराम मिळण्यास मदत होते. यामुळे झोप, स्मरणशक्ती, स्नायूंचं आरोग्य स्टॅमिना वाढण्यास मदत होते.

दूध आणि केशर

स्टॅमिना वाढवायचा असेल दुधामध्ये केशर मिसळा. केशरमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट असतात जे हार्मोनल आरोग्य सुधारण्यास आणि शरीर निरोगी ठेवण्यास फायदेशीर असतात. सतत मूड स्विंग होणाऱ्या व्यक्तींनाही याचा फायदा होतो.

Sumitra nalawade: