वंसत मोरेंच्या पोस्टनंतर महाराष्ट्राच्या ‘खली’ला लाखोंची मदत, जाणून घ्या!

पुणे – Vasant More Facebook Post For Umesh Vasave | पुण्यातील मनसे नेते आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा खली म्हणून प्रसिद्ध असलेल्या उमेश रमेश वसवे यांना शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहान केलं होतं. त्यानंतर लोकांनी भरभरून वसवे यांना मदत केली आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

महाराष्ट्राच्या खलीला गरज तुमच्या मदतीची…हा आहे कै.सोनेरी आमदार रमेशभाऊंचा अंगरक्षक उमेश रमेश वसवे राहणार सिंहगड वसवेवाडी, वय अवघे 40 उंची तब्बल 7 फूट, वजन 165 किलो अशी प्रचंड शरीर संपत्ती लाभलेला उमेश गेल्या 2 वर्षांपासून आजाराने व्यापलाय. होतं नव्हतं ते सगळे जगण्याच्या धडपडीत गमावून बसलाय.

लोकांना सुरक्षा देणारा खली आज जगण्यासाठी ढसाढसा रडताना पाहिलाय. पुण्यातील एका नामांकित बिल्डरने त्याचे कष्टाचे पैसे बुडवलेत, मी त्या बिल्डरला फोन केला तर पैसे नाहीत बोलला ठीक आहे त्याला थोडा सवडीने बघतो. पण मित्रांनो हा उमेश म्हणजे आपल्या महाराष्ट्राची संपत्ती आहे, अशी पोस्ट वसंत मोरे यांनी केली होती.

या पोस्टनंतर वसवे यांना मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. आज आता रोतोरात हा आपला खली लखपती झाला 5 लाख 35 हजार 534 रुपयांचे भरगोस दान त्याच्या झोळीत टाकल्याचं मोरे म्हणाले.

RashtraSanchar: