रेल्वे राज्यमंत्र्यांनी ठाकरे सरकारवर केली टीका

कोल्हापूर : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोष यांनी ठाकरे सरकारचा उल्लेख डबल इंजिन सरकार असा करत ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. त्यांनी वाढत्या महागाईवरूनही ठाकरे सरकारला लक्ष्य केले.

रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोष कोल्हापूर दौर्‍यावर आहेत. त्यांनी राज्यात सुरू असलेल्या बुलेट ट्रेन कामाच्या गतीवरूनही ठाकरे सरकावर हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, डबल इंजिन सरकार ज्या राज्यांमध्ये आहेत त्या ठिकाणी योजनांची काय अवस्था झाली आहे, हे तपासून पाहावे.

केंद्र सरकारच्या सर्व योजना व्यवस्थितरीत्या सुरू आहेत. जे प्रकल्प हाती घेतले आहेत ते पूर्णत्वास नेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना राज्याचे प्रश्न चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. ज्या कामाचा शुभारंभ आम्ही करतो त्या कामाचे उद्घाटनदेखील आम्हीच करतो. भाजप विकासकामात राजकारण करीत नसल्याचे सांगत दर्शना जरदोष यांनी बिगर भाजपशासित राज्यांवर टीकास्त्र सोडले.

रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोष यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पावरूनही ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. त्यांनी यासाठी गुजरातचे उदाहरण दिले. त्या ठाकरे सरकारवर टीका करताना म्हणाल्या की, गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, पण नवसारी स्टेशननंतर काम अगदी धीम्या गतीने सुरू आहे. जरदोष यांनी एकप्रकारे राज्यामध्ये बुलेट ट्रेनचे काम संथ सुरू असल्याची टीका केली आहे.

Sumitra nalawade: