इर्शाळवाडीतील बचाव कार्य थांबवले
रायगड | रायगडमधील इर्शाळवाडी (Irshalwadi) दरड दुर्घटनेमध्ये मृतांची संख्या आतापर्यंत 29 इतकी झाली आहे, तर 52 ग्रामस्थ अद्याप बेपत्ता आहेत. या ठिकाणी आजही बचाव मोहीम सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्च ऑपरेशन रविवारपासून थांबवण्यात आल्याचे रायगडचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.
खालापूर पोलीस ठाण्यात सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. इर्शाळवाडीत आतापर्यंत 29 मृतदेह सापडले आहेत, परंतु 57 जण बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करून आजपासून एनडीआरएफची शोधमोहीम थांबवण्यात आली आहे. दरम्यान, बचावलेल्या 144 लोकांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट सांगितले आहे. दरम्यान, पावसामुळे दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने इतरांना इर्शाळवाडीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाकडून इर्शाळवाडीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. बुधवारी रात्री इर्शाळवाडीवर दरड कोसळली होती.