उत्तराखंड येथील स्वर्गारोहण मार्गावर पांडवांच्या भव्य मूर्ती, स्वर्गारोहण महाद्वार व विश्वशांती घंटेची स्थापना

पुणे | महाराष्ट्रातील ज्ञानभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांची आळंदी ते देवभूमी म्हणून ओळखले जाणाऱ्या उत्तराखंड हा ज्ञानप्रवास पुण्याच्या माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या संकल्पनेतून माणा गाव, उत्तराखंड येथे साकार झालेल्या श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान धाम/मंदिर, ऐतिहासिक स्वर्गारोहण मार्गावर पांच पांडवांच्या कांस्य धातुपासून बनवलेल्या भव्य मूर्ती, स्वर्गारोहण महाद्वार व विश्वशांती घंटेच्या स्थापनेद्वारे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाला. त्यासंदर्भातील पत्रकार परिषद पुण्यातील MIT-WPU पुणे येथे पार पडली. यावेळी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमावेळी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल व उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी प्रमुख पाहुणे म्हणून तर माजी खासदार व अयोध्या येथील रामजन्मभूमी शिलान्यासचे माजी कार्यकारी अध्यक्ष, रामायणाचे ख्यातनाम प्रवचनकार डॉ. रामविलास वेदांती, अध्यात्मिक गुरू व साधक योगी अमरनाथ, उत्तराखंड भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष महेंद्र भट्ट, आमदार सुरेश व नंदनसिंग कोश्यारी, चमोली जिल्ह्याच्या विशेष न्यायदंडाधिकारी कुमकुम रोशी, माणा गावचे मुख्य प्रधान पितांबरसिंह मोल्पा असे अनेक मान्यवर पाहुणे यावेळी पस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधमी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.

Rashtra Sanchar Digital: