ऑक्सिजनची मात्रा वाढविण्यासाठी सर्वांनी समोर यावे; पाशा पटेल

एमआयटी डब्ल्यूपीयूत दोनदिवसीय सिटिझन्स क्लायमेट मॅनिफेस्टो कार्यशाळेचे उद्घाटन. सृष्टीवरील वाढत्या तापमानामुळे भविष्यात जवळपास ४० टक्के शेतीचे उत्पादन, मासे आणि दूध कमी होईल. पण वाढत जाणार्‍या जनसंख्येला काय परिणाम भोगावे लागतील याची कल्पना करणे ही अवघड आहे. जल ही जीवन है, हे लक्षात ठेवून देशातील सर्व नद्यांच्या किनार्‍याला बांबूची लागवड करून तापमानाला नियंत्रित करावे. तसेच नदी वाचविणे व ऑक्सिजनची मात्रा वाढविण्यासाठी सर्वांनी समोर यावे.

पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीच्या सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च अंतर्गत आयोजित ‘पुणे सिटिझन्स क्लायमेट मॅनिफेस्टो’ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल बोलत होते.

यावेळी भारताचे माजी मुख्य निवडणुक आयुक्त ओम प्रकाश रावत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुणे विभागाचे वनसंरक्षक अधिकारी राहुल पाटील हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, प्रकुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. सुधाकर परदेशी व सिडॅकच्या डॉ. अक्षरा कागीनाळकर उपस्थित होते.

पाशा पटेल म्हणाले, कार्बन डायऑक्साइडमुळे वाढणारे जागतिक तापमान व हवामान बदलाच्या समस्या वरील विषयाचा उल्लेख हिंदू धर्मामध्ये सापडतो. त्यामुळे प्रत्येकाने ऑक्सिजनची मात्रा अधिक सोडणार्‍या वृक्षांची जोपासना करावी. वड, पिंपळ आणि बांबूसारख्या वृक्षांची लागवड करावी. सृष्टी वाचविण्यासाठी प्लास्टिकचा वापर बंद करून बांबूपासून निर्मित वस्तूंचा वापर वाढवावा.

ओमप्रकाश रावत म्हणाले, पर्यावरणाच्या र्‍हासामुळे सृष्टीचा विनाश होईल या भीतीपेक्षा सर्वांनी संरक्षणासाठी पावले उचलावीत. समाज जागृती करून कार्य करावे. गावागावांमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये बाहेर येणार्‍या पैशाचा उपयोग हा पर्यावरण संरक्षणावर खर्च करावा. राहुल पाटील म्हणाले, सृष्टीवरील बदलत्या वातावरणाच्या नियंत्रणासाठी जनतेचा मोठा सहभाग गरजेचा आहे. एकीकडे जागतिक तापमानवृद्धी आणि समुद्राची पातळी वाढताना दिसत आहे. मानवजातीसाठी ही धोक्याची घंटा असून, त्यासाठी परिसरात वृक्षारोपण करावे.

राहुल विश्वनाथ कराड म्हणाले, पर्यावरण हे प्रत्येक व्यक्तीशी जुळलेले आहे. परंतु आधुनिकतेच्या काळात याचा मोठा र्‍हास होताना दिसतो. डॉ. विश्वनाथ कराड यांनी सतत पर्यावरण रक्षण आणि विश्वशांतीसाठी
कार्य करीत आहेत.

Dnyaneshwar: