मुंबई :
मुंबई : (CM Eknath Shinde On Shivsena) मुख्यमंत्री सभागृहात बोलताना म्हणाले, आपल्याला व्यवस्था बदलावी लागेल. या सत्तेचा वापर सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे. शेवटच्या घटकांपर्यंत या योजना पोहचल्या पाहिजेत. मला तर व्यक्तिगत स्वार्थ नाहीच. मी ना कधी माड्या बांधल्या, ना मोठे फाईव्ह स्टार हॉटेल बांधले किंवा संपत्ती घेतली नाही.
दरम्यान पुढे शिंदे म्हणाले, आता या आमदारांचा हक्काचा माणूस आला आहे. ते माझ्याकडे पत्र घेऊन येतात. ते म्हणतात यावर लिहा. मी म्हणतो आता लिहायचं नाही, थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करतो आणि काम करायला सांगतो. विषय संपला. लिखापडी बंद, त्यात वेळ जातो. तपासून सादर करा यात खूप वेळ जातो. असं मुख्यमंत्री सरकारच्या अभिनंदनपर भाषणात विधानसभा अधिवेशनात बोलत होते.
शेवटी आम्ही ५० आमदार आहोत. प्रत्येकजण ७० हजार, ८० हजार, १ लाख, दीड लाख अशी मतं घेऊन निवडून आले आहेत. प्रत्येकाकडे स्वतःचे हजार दोन हजार लोक आहेत. ते सर्व कार्यकर्ते दबंग आहेत, पण आम्ही ते शस्त्र बाहेर काढलं नाही. असं मुख्यमंत्री नाव न घेता शिवसेनेला म्हणाले.