मुंबई | Sheetal Mhatre Viral Video – सध्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्याबरोबरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसंच आज (13 मार्च) हा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उपस्थित झाला. यावेळी आमदार मनिषा चौधरी (Manisha Chaudhari) यांनी शीतल म्हात्रेंचा व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल केल्याचं सांगत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. तर या प्रकारामुळे शीतल म्हात्रेंचं आयुष्य बरबाद होईल, असंही चौधरी म्हणाल्या.
मनिषा चौधरी म्हणाल्या की, “शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओची सखोल चौकशी व्हायला हवी. त्या माझ्या सहकारी आणि नगरसेविका होत्या. अशा प्रतिष्ठीत महिलेबाबत रॅलीतील व्हिडीओची मॉर्फींग झाली आहे. एका महिलेनं सारखं माध्यमांसमोर येऊन मी चुकीची नाही असं कितीवेळा स्वतःला सिद्ध करायचं.”
“या प्रकरणावर कधी कारवाई होणार? तिचं या मॉर्फिंगमुळे आयुष्य बरबाद होईल. ती एक विवाहीत महिला आहे. ज्यानं हे केलं आहे त्यावर कारवाईचे आदेश द्यावेत,” अशी मागणीही मनिषा चौधरी यांनी केली.
View Comments (0)