“जसं मला माझं बाळ महत्त्वाचं आहे तसंच…”, अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन आमदार पोहोचल्या विधान भवनात

saroj ahiresaroj ahire

नागपूर | Saroj Ahire In Session – आजपासून (19 डिसेंबर) विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) चर्चेचा आल्या आहेत. सरोज अहिरे या आपल्या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या असून हा आपल्यासाठी सुखद: क्षण असल्याचं आहिरे यांनी सांगितलं.

नाशिकच्या आमदार सरोज अहिरे आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधान भवनात आल्या आहेत. त्यांचं अडीच महिन्यांचं बाळ प्रशंसक हा त्यांच्या शिवाय राहत नाही म्हणून त्या आपल्या बाळाला घेऊन आज विधान भवनात पोहोचल्या. “मतदारसंघाचे प्रश्न महत्त्वाचे असून ते विधानसभेत येऊन उचलणे आवश्यक आहेत. तसंच अडीच महिन्याच्या बाळाची आई म्हणून त्याच्याबद्दल ही कर्तव्य बजावणं महत्त्वाचं आहे. म्हणून दोन्ही कर्तव्य एकाच वेळी बजावत आहे”, असं मत अहिरेंनी व्यक्त केलं.

दरम्यान, प्रशंसक असं सरोज अहिरे यांच्या बाळाचं नाव आहे. त्याचा 30 सप्टेंबरला जन्म झाला. त्यानंतर प्रथमच अधिवेशन असल्यानं त्या बाळ व पती प्रवीण वाघ आणि अन्य कुटुंबीयांसह विधानभवनात पोहोचल्या. कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे. अधिवेशन किती दिवस चालेल माहिती नाही, लोकांचे अधिकाधीक प्रश्न सोडवण्यावर भर राहणार असल्याचं अहिरेंनी सांगितलं.

Sumitra nalawade:
whatsapp
line