मुंबई | MLA Yogesh Kadam Accident – शिंदे गटाचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या गाडीला भीषण अपघात (Accident) झाला आहे. योगेश कदम यांच्या गाडीला रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला आहे. या अपघातात योगेश कदम बचावले असून त्यांना किरकोळ मार लागला आहे. तर त्यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यानंतर योगेश कदम यांनी अपघाताची माहिती देत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (MLA Yogesh Kadam Accident)
फेसबुक पेजवर व्हिडीओ पोस्ट करत योगेश कदम यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मी मुंबईला जात असताना माझा अपघात झाला आहे. हा अपघात रात्री सव्वादहाच्या सुमारास झाला. परंतु, आई जगदंबेच्या कृपेनं आणि जनतेच्या आशिर्वादानं मी व माझे सर्व सहकारी या अपघातातून सुखरुप बचावलो आहोत.”
“कोणीही आमची चिंता करू नका. आपल्या सर्वांच्या आशिर्वादानं आज आम्ही एका मोठ्या अपघातातून वाचलो आहोत. मला कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. तसंच मी पुढील सर्व नियोजित कार्यक्रम जसे होते तसेच करणार आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी असू द्या”, असंही योगेश कदम म्हणाले.
https://www.facebook.com/watch/?v=996505267978688
दरम्यान, योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले होते. त्यावेळी कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरनं त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यानंतर टँकरचालक पळून गेल्याची माहिती आहे. तसंच योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्यानं त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये कदम यांच्या गाडीचं मागच्या बाजूचं नुकसान झालं आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.