“…त्यासाठी मामूला अजून सात जन्म घ्यावे लागतील”, मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुंबई | Gajanan Kale On Uddhav Thackeray – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत झालेल्या गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना शिंदे गट (Shinde Group), भाजप (BJP) आणि राज्य सरकारवर (State Government) निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी मनसेवर (MNS) देखील टीका केली होती. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी मनसे प्रमुख राज ठाकरेंचा (Raj Thackeray) ‘मुन्नाभाई’ असा उल्लेख करत त्यांना खोचक टोला लगावला होता. त्यावरून आता मनसेनं उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

“आता पुढच्या आठवड्यात कदाचित पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. मुंबई पालिका जिंकण्यासाठी स्वत: पंतप्रधान उतरत आहेत. केंद्रीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. गृहमंत्री आहेतच. आपले गद्दार आहेतच. मुन्नाभाईही आहेत. सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटून पडणार आहेत”, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यावर आता मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी खोचक ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

गजानन काळे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आदित्य ठाकरेंसाठी वरळीत मनसेचा उमेदवार न देता राजसाहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला. 2012 ला एकनाथ शिंदेंनी राजसाहेबांची भेट घेतली असता ठाणे मनपात सेनेच्या महापौर पदासाठी मनसेच्या 7 नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला. मुन्नाभाईच काळीज कळायला मामूला अजून सात जन्म घ्यावे लागतील. गेट वेल सून मामू”, असा खोचक टोला गजानन काळेंनी लगावला आहे.

Sumitra nalawade: