मुंबई | Sandeep Deshpande On Uddhav Thackeray – काल (5 ऑक्टोबर) शिवसेनेच दोन दसरे मेळावे पार पडले. एकीकडे शिवसेनेचा (Shivsena) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) तर दुसरीकडे शिंदे गटाचा (Shinde Group) बीकेसी मैदानावर (BKC Ground) दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. तसंच उद्धव ठाकरे यांनी मेळाव्याच्या वेळी केलेल्या भाषणात भाजप आणि शिंदे गटातील बंडखोर आमदार यांच्यावर सडकून टीका केली. हिंदुत्व, आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांची मशिदीला दिलेली भेट या सर्व मुद्यांवरून ठाकरे यांनी टीका केली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या भाषणावर मनसेनं (MNS) ट्विटद्वारे पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी एक ट्विट केलं आहे. “नुसतीच ‘उणी’ ‘धुणी’ ‘नळ’ आणि ‘भांडण’, विचार ही नाही आणि सोन ही नाही,” असं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
दरम्यान, कालच्या दसरा मेळाव्यानंतर संदीप देशपांडे यांनी हे ट्विट केलं. विचार ही नाही आणि सोनं ही नाही, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. तसंच ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे हे नळावरच्या भांडणाप्रमाणे होते असा टोला देखील देशपांडेंनी लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामधून उणीधुणी काढल्याचंही देशपांडे म्हणाले.