मनसे नेते वसंत मोरे जेव्हा टपरीवर चहा बनवतात…

पुणे | मनसे नेते वसंत मोरे हे सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. त्यांच्या जीवनातील काही खास क्षण ते सर्वांसोबत शेअर करत असतात. मनसेचे ते पुण्यातील प्रभावी नेते असल्याने त्यांच्या प्रत्येक कृतीची चर्चा होत असते. आता ते आणखी एका कारणाने चर्चेत आले आहेत. चर्चा राजकीय नाही. पण चर्चा रंगली आहे. वसंत मोरे यांचा चक्क टपरीवर चहा बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरचं कॅप्शनही जोरदार आहे. त्यामुळे वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांच्या या व्हिडीओची सध्या पुण्यात जोरदार चर्चा आहे.

वसंत मोरे यांनी त्यांच्या सोशल मीडीयावरून त्यांचा चहा बनवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 37 सेकंदच्या या व्हिडीओमध्ये वसंत मोरे खास चहा बनवताना दिसत आहेत. चहापत्ती, साखर टाकल्यानंतर त्यात अद्रक किसून टाकताना दिसत आहेत. नंतर वाफळलेला चहा हिसळून घेताना दिसत आहेत. या व्हिडीओला त्यांनी ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल हे साजेसं असं गाण लावलं आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत 5 लाख 44 हजार लोकांनी हा व्हिडीओ आतापर्यंत पाहिला आहे.

ब्रँड तयार करायचा म्हटलं ना की स्वतः झिजाव लागतं… #mount88 ला स्पेशल चहा बनवला… मग येताय ना चहा नाष्टा आणि REDDY’S TANDOOR ची तंदूर खायला…बोपदेव घाट संपला की फक्त 5 मिनिटांवर भिवरी बोपगाव, सासवड रोड, अशी कॅप्शन वसंत मोरे यांनी या व्हिडीओला दिली आहे.

Dnyaneshwar: