राज ठाकरेंनी बोलावली तडकाफडकी बैठक; अमित ठाकरे करणार अहवाल सादर, पुण्यातून कुणाला संधी?

पुणे | खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचं निधन झाल्यानंतर पुण्याच्या लोकसभेची (Pune Loksabha Election) जागा रिक्त झाली आहे. या जागेवर कधीही पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या या जागेसाठी भाजपसह (BJP) काँग्रेस (Indian National Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अनेक इच्छुक उमेदवार आहेत. यावरून या पक्षांमधील नेत्यांमधेच जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आता या जागेसाठी मनसे (MNS) देखील मैदान उतरणार असल्याचं दिसत आहे. यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाची 2 ऑक्टोबर रोजी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

या बैठकीत 20 लोकसभा मतदारसंघांची चर्चा होणार आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 20 लोकसभा मतदारसंघांसाठी 20 निरीक्षक नेमले होते. हे निरीक्षक आता 2 तारखेला आपला अहवाल सादर करणार आहेत. सदर बैठकीत राज ठाकरे अहवाल पाहून पुढचा निर्णय घेणार आहेत. यामध्ये मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यावर पुणे लोकसभा मतदारसंघाचा निरीक्षक म्हणून जबाबदारी होती. ते देखील या बैठकीत आपला अहवाल सादर करणार आहेत.

नुकतीच अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी पुण्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली होती. पुणे लोकसभा मतदारसंघातून मनसेचे कोणते नेते इच्छुक आहेत, याबाबत देखील अमित ठाकरे यांनी चाचपणी केली होती. हा सर्व अहवाल अमित ठाकरे 2 तारखेच्या बैठकीत राज ठाकरे यांच्यासमोर ठेवणार आहेत.

दरम्यान मनसेकडून पुण्यातील आपला हुकमी एक्का फायरब्रॅन्ड नेते म्हणून ओळख असलेले वसंत मोरे (Vasant More) यांना उमेदवारी देण्याची मागणी महाराष्ट्र सैनिक करत आहेत. त्यामुळे मोरे यांच्या नावावर किती एकमत होईल यात शंकाच आहे. परंतु, आता खुद्द अमित ठाकरे यांनी पुणे लोकसभेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोरेंच्या दाव्याचे काय होते? अमित ठाकरे यांच्या अहवालात मोरे यांच्याबाबत काय मत व्यक्त केले आहे? हे मनसेच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल.

Dnyaneshwar: