आम्ही जे 60 वर्षात केलं तेच विकून तुम्ही सरकार चालवत आहात- सुप्रिया सुळे

परभणी – Supriya Sule on Narendra Modi | नरेंद्र मोदी यांनी एवढ्या संस्था विकल्या, पण ते आम्हाला विचारतात की आम्ही 60 वर्षांत काय केलं, तेच विकून तर तुम्ही सरकार चालवत आहात, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule on Narendra Modi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे.

परभणीमधील (Parbhani) सोनापेठ येथे आयोजित एका बालविवाह प्रतिबंध जागृती अभियान महिला परिषद या कार्यक्रमादरम्यान बोलताना सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. गरीबांना मोफत सिलेंडर देतो म्हणून इतरांची सबसिडी काढून घेतली. ना गरिबांना सिलेंडर दिले, ना इतरांना. महिलांना मोदींच्या धोरणामुळे पुन्हा चुलीकडे वळावं लागल असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

मला मोदींना सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांची आठवण करून द्यायची आहे. जेव्हा त्या विरोधी पक्षामध्ये होत्या तेव्हा सिलेंडर 400 रूपये होता आणि आता हजाराच्या वर गेला आहे. याचं त्यांना भान आहे का?, अस सवालही सुप्रिया सुळेंनी केला.

RashtraSanchar: