“मोदींनी अनावरण केलेला संसदेवरील अशोक स्तंभ रागीट, विसंगत”

नवी दिल्ली – Ashoka Stambha Parliament : काल (सोमवार) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीवर बांधण्यात येत असलेल्या अशोक स्तंभाचं अनावरण केलं आहे. मात्र, त्यावरून देशातील अनेक नेत्यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या इमारतीवरील अशोक स्तंभाचं अनावरण करून घटनात्मक नियमांचं उल्लंघन केलं आहे. अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी सोमवारी सोमवारी केली होती.

पंतप्रधानांकडून अनावरण करण्यात आलेला अशोक स्तंभ २० फुट उंच असून ९ हजार ५०० किलो वजनाची आहे. आणि कांस्य पासून तयार करण्यात आलेला आहे. मात्र, हा अशोक स्तंभाची प्रतिमा रागीट आणि आक्रमक असून मूळ अशोक स्तंभाशी विसंगत आहे. राष्ट्रीय चिन्ह समजल्या जाणाऱ्या मूळ अशोक स्तंभातील सिंह शांत, संयमी, सुंदर आणि डौलदार आहे. त्यामुळे अशोक स्तंभाची प्रतिमा बदलून मोदी सरकारने राष्ट्रीय चिन्हाचा अपमान केला आहे असा आरोप केला जात आहे.

तृणमूल कॉंग्रेसचे खासदार जवाहर सरकार आणि महुआ मोईत्रा यांनी संसदेच्या नवीन इमारतीवरील अशोक स्तंभाची प्रतिमा विसंगत आणि आक्रमक बसवून राष्ट्रीय चिन्हाचा अपमान केला असल्याचा आरोप ट्विटच्या माध्यमातून केल आहे. जवाहर सरकार यांनी नवीन इमारतीवरील अशोक स्तंभ ताबडतोब बदलण्याची मागणी केली आहे. मोईत्रा यांनी मूळ अशोक स्तंभ आणि नवीन अशोक स्तंभ यांचा एक एकत्रित फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

Dnyaneshwar: