पुणे | विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातून एक सुखद बातमी आहे. कधीकाळी राजकारण गाजवणाऱ्या शेतकरी कुटुंबातील ॲड. मोहिनी बापूराव भागवत (शेलार) (Mohini Bhagawat) यांनी मोठे यश मिळवले आहे. राजकारणातून न्यायव्यवस्थेकडे जाणाचा पराक्रम ॲड. मोहिनी बापूराव भागवत (शेलार) (Mohini Bhagawat) यांनी केला आहे. सरपंच असलेल्या मोहिनी आता प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत त्यांची निवड झाली आहे. सरपंचापासून न्यायव्यवस्थेकडे वाटचाल करणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिला आहे.
ॲड. मोहिनी (Mohini Bhagawat) यांचा जन्म शेतकरी कुटुंबातला. शेतकरी कुटुंबातून शिक्षण विधी शाखेची पदवी घेतली. त्यांचा विवाह ॲड. बापूराव भागवत यांचीशी झाला. ॲड बापूराव भागवत यांचे पती हे दौंड तालुका भाजपा (BJP) युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. बापूराव यांनीही मोहिनी यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे एमपीएससीचा अभ्यास त्यांनी सुरु केला. आता या परीक्षेत यश मिळवले.