“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक बोलबच्चन होते…”, मोहीत कंबोज यांचं खोचक ट्विट

मुंबई | Mohit Kamboj On NCP – भाजप नेते मोहीत कंबोज हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मोहीत कंबोज हे महाविकास आघाडीतील नेतेमंडळींवर सातत्याने टीका करत असतानाच आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यामध्ये त्यांनी रोहित पवार यांना लक्ष्य करत रविवारी सकाळी तीन ट्विट केले आहेत. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी त्यांनी रोहित पवार यांचं नाव घेतलं असून राष्ट्रवादीच्या इतर दोन अटकेत असलेल्या नेत्यांवरूनदेखील खोचक टोला लगावला आहे.

मोहीत कंबोज यांनी घोटाळ्यांमध्ये सगळी चूक भाजपाचीच आहे, अशा शब्दांत खोचक टोला लगावला आहे. “2006 मध्ये भाजपानेच रोहीत पवार यांना पीएमसी बँक आणि एचडीआयएल घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांचे पार्टनर बनायला भाग पाडलं”, असं मोहीत कंबोज ट्विटमध्ये खोचकपणे म्हणाले आहेत.

“स्वत: सगळे घोटाळे करून आता ते समोर आल्यावर भाजपाला दोष देण्याचा हा एक नवीन धंदा आहे. जर तुम्ही काही चुकीचं केलंच नाहीये, तर मग घाबरण्याचं काय कारण? खरा माणूस कधीच कोणत्या चौकशीला घाबरत नाही. ज्याच्या मनात चोर आहे, तोच घाबरतो. ज्यांची घरं काचेची असतात, ते दुसऱ्यांच्या घरांवर दगड मारत नाही”, असं ट्विट देखील मोहीत कंबोज यांनी केलं आहे.

पुढे त्यांनी आणखी एक ट्विट करत खोचक टोला लगावला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक बोलबच्चन होते..मियाँ नवाब मलिक (सलीम) आणि शिवसेनेत संजय राऊत (जावेद)! आता वाटतंय की या दोघांच्या जागांसाठी त्यांच्या पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. चालू द्या, पण नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका”, असं देखील कंबोज या ट्विटमध्य म्हणाले आहेत.

Sumitra nalawade: