मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यशवंत माने यांचा विजय सुकर होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची उमेदवारी कु. सिद्धी रमेश कदम यांना देण्यात आल्याची चर्चा आहे.मोहोळचे नेते राजन पाटील आणि मोहिते पाटील यांच्या घराण्याचे संबंध जगजाहीर आहेत. राजन पाटील यांनी शरद पवार यांच्याशी काडीमोड घेऊन अजित पवार यांच्यासोबत घरोबा केला असला तरी मोहिते पाटील आणि राजन पाटील यांचे स्नेहत्वाचे संबंध कायम आहेत राजन पाटील यांचे गटाचे असलेल्या यशवंत माने यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधामध्ये नागनाथ क्षीरसागर , राजू खरे , रमेश कदम अशा अनेक जणांनी तेथे उमेदवारी मागितली होती.त्यापैकी नागनाथ क्षीरसागर किंवा राजू खरे यांना उमेदवारी मिळेल असे वाटत होते . परंतु ही जागा शिवसेनेकडून काढून घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपल्याकडे घेतली आणि तेथून सिद्धी कदम या नवख्या , मतदारसंघाला परिचित नसलेल्या आणि नागरिकांपासून डिस्कनेक्ट असलेल्या उमेदवाराला तेथे उमेदवारी देण्यात आली आहे . मोहिते पाटील यांनी या जागेच्या निर्णयाचे सर्वाधिकार घेतले आणि तेथे सिद्धी कदम यांच्या नावाची जोरदार शिफारस केली यातूनच येथे राजन पाटील यांना मदत व्हावी हा अंतर्गत अजेंडा असल्याचे समजते.
राजन पाटील यांच्यासह असलेले स्नेहत्वाचे संबंध कायम राहावे यासाठी त्यांना सहकार्याची भूमिका यामध्ये दिसल्याची चर्चा आहे . राज्यात सर्व कडे अजित पवार विरुद्ध शरद पवार असा कट्टर संघर्ष होत असताना मोहोळ मध्ये मात्र एक प्रकारे ही मैत्रीपूर्ण लढत दिसत आहे .यशवंत माने यांच्या विजयासाठी हातभार लागावा यासाठीच तेथे सिद्धी कदम या सॉफ्ट उमेदवार देण्यात आल्या आहेत.परंतु या तालुक्यात राजन पाटील , यशवंत माने यांच्या विरोधामध्ये एक मोठा गट कार्यरत आहे. या गटाला मात्र शिवसेना किंवा राष्ट्रवादीची साथ लाभेल असे वाटत होते मात्र ती अपेक्षा फोल ठरली .आता जर राजू खरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर मात्र या मतदारसंघात चमत्कार घडण्याची शक्यता आहे.रमेश कदम यांची प्रतिमा आणि कुठलेही कार्य कर्तृत्व तसेच कुठलाही संपर्क नसलेल्या त्यांच्या कन्येची उमेदवारी ही मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यातील या मतदार संघाचे निगडित असलेल्या गावांमध्ये चेष्टेचा विषय झाला आहे.
पवारांना पूरक पवार ! राज्यात एकमेव मैत्रीपूर्ण लढत ?
राज्यभर शरद पवार विरुद्ध अजित पवार हा संघर्ष टोकाचा दिसत असताना मोहोळ मध्ये मात्र शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत व्हावी म्हणून शरदचंद्र पवार गटाकडून वीक उमेदवार देण्यात आल्याची चर्चा आहे . राजन पाटील , यशवंत माने यांचे मोहिते पाटील यांच्याशी असलेले स्नेहत्त्वाचे संबंध पाहता एक प्रकारे ही मैत्रीपूर्ण लढत होत असल्याचे दिसते.