ALERT : WHO कडून ‘मन्कीपॉक्स’ जागतिक आणीबाणी म्हणून घोषित

नवी दिल्ली Monkeypox As Global Health Emergency : जगभरात वेगाने प्रसारित होत असलेल्या मन्कीपॉक्सच्या प्रसाराला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शनिवारी आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी याबाबत माहिती दिली.

युरोप हे सध्या मन्कीपॉक्सच्या प्रसाराचे केंद्र बनले असले तरी भारतात देखील मन्कीपॉक्सचे रुग्ण समोर आले आहेत. मागील हप्त्यात केरळ मध्ये दोन रुग्ण सापडले आहेत, ते विदेशातून परतलेले होते मात्र, नुकतंच दिल्लीमध्ये पहिला मन्कीपॉक्सचा रुग्ण आढळल्याची माहिती आहे. दिल्लीत आढळलेला रुग्ण विदेशातून आलेला नसताना त्याला मन्कीपॉक्सची लक्षणे आढळून आली आहेत.

मन्कीपॉक्सचा प्रसार मे मध्ये सुरू झाला, 20 मे रोजी फक्त ब्रिटनमध्ये 20 प्रकरणे नोंदली गेली. तेव्हापासून, डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, 20 जुलैपर्यंत जवळजवळ 14,000 प्रकरणे समोर आली. त्यामुळे या रोगाच्या प्रसाराचा वेग लक्षात घेता आणि त्यावर संशोधन देखील जास्त झालेले नसल्याने मन्कीपॉक्सला जागतिक आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Dnyaneshwar: