आनंदाची बातमी! मान्सून केरळात दाखल, राज्यात लवकरच आगमन; हवामान विभागाची माहिती

Monsoon News in India 2023 : जून महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी, राज्यातील उन्हाचा पारा काय कमी होणाचा नाव घेताना दिसत नाही. त्यामुळे राज्यातील बळीराजाचं लक्ष वरुणराजा कधी बरसतो याकडे लागलं आहे. याच पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सून केरळमध्ये (Monsoon in Kerala) दाखल झाला असून, लवकरच राज्यात दाखव होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची (Monsoon Update) प्रतीक्षा संपणार आहे. अशा माहितीची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) करण्यात आली आहे.

दरम्यान, एका आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर आज मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मान्सून (Monsoon 2023) केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी देखील समाधानी झाले आहेत. यंदा जवळपास एक आठवड्याने उशिरानं मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्याचं दिसून येत होतं. मात्र, उशिरा का होईना पण वरुणराजा येणार ही बातमी बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी आहे. त्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता आनंद फुलू लागला आहे.

नैऋत्य मान्सून केरळात दाखल झाला आहे, अशी औपचारिक घोषणा हवामान खात्यानं दिली आहे. केरळच्या बहुतांश भागांमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे. मान्सूनला यंदा तब्बल सात दिवस विलंब झाला आहे. एरवी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतं असतो. मात्र, यंदा यासाठी 8 जूनची तारीख उजाडावी लागली. तळकोकणात 16 जून किंवा त्यानंतरच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

हवामान खात्यानं गुरूवारी मान्सून केरळमध्ये (Monsoon) दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली. केरळच्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला. मान्सूनच्या आगमनानं गरमीनं हैराण झालेल्या नागरीकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यात पुढच्या तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह यलो अलर्ट देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागच्या (IMD) एका वरिष्ठ शास्तज्ञानं याबाबत माहिती देत सांगितलं आहे की, बिपरजाॅय चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण द्विपकल्पात पाऊस पडेल. तसेच चक्रीवादळ क्षीण झाल्यानंतर दक्षिणेकडील द्विपकल्पाच्या पलीकडे मान्सूनची पुढील वाटचाल सुरु होईल. केरळमध्ये सुरू झाल्यानंतर, 12 जूनच्या सुमारास बिपरजाॅय चक्रीवादळ क्षीण होईपर्यंत पाऊत कमी प्रमाणात होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Prakash Harale: