‘या’ तारखेपासून मान्सून महाराष्ट्राचा घेणार निरोप! हवामान विभागाची माहिती

Rain 1Rain 1

मुबंई : महाराष्ट्राचा या वर्षी मान्सून येत्या 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान परतीच्या मार्गावर असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, राज्यात सोमवार दि. 27 सप्टेंबरपासून राज्यात परतीच्या पावसाचा आंदाज असल्याने महाराष्ट्रभर यावेळी पाऊस हजेरी लावणार आहे.

दरम्यान, 27 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या आठवडाभरातील पाऊस झाल्यानंतर 8 तारखेला पाऊस राज्यातून ओसरत जाणार आहे. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसानं राज्यात धुमाकूळ घातला होता. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील राज्यात चांगल्या पावसानं हजेरी लावली होती. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

मात्र, काही ठिकाणी जास्तीच्या पावसाने अतवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे बळीराजा सरकारच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहे.

Prakash Harale:
whatsapp
line