अमृता फडणवीसांचा बोल्ड अंदाज, नवीन गाण्याला काही तासांतच मिळाले लाखो व्ह्यूज

मुंबई | Amruta Fadnavis New Song – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमी काहीना काही कारणांमुळे चर्चेत येत असतात. त्या नेहमी समाजातील विविध मुद्द्यांवर आपलं मत मांडताना दिसतात. तसंच अमृता फडणवीस या एक उत्तम गायिका देखील आहेत. आत्तापर्यंत त्यांनी गायलेली गाणी प्रेक्षकांच्या चांगलीस पसंतीस पडली आहेत. अशातच आता नवीन वर्षात त्यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. ‘मूड बना लिया’ (Mood Banaleya) हे त्यांचं नवीन गाणं प्रदर्शित झालं असून या गाण्यात अमृता फडणवीस बोल्ड अंदाजात दिसत आहेत.

अमृता फडणवीस यांचं हे गाणं त्यांच्या इतर गाण्यांप्रमाणेच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्याला अवघ्या काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं टी सीरिजच्या युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. तसंच या गाण्यात अमृता यांचा बोल्ड आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे. या गाण्यात अमृता यांनी डान्सदेखील केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी त्यांच्या या नवीन गाण्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर या गाण्याचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरमध्ये अमृता यांच्या डान्सची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली होती. तेव्हापासूनच अमृता यांच्या नव्या गाण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली होती.

Sumitra nalawade: