अफगाणिस्तान : अफगाणिस्तानमधल्या मजारशरीफ शहरातील एका मशिदीत भयानक स्फोट झाला आहे. या स्फोटात किमान २० जणांचा मृत्यू झाला असून साठपेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जारशरीफ हे शहर अफगाणिस्तानातल्या बल्ख प्रांतात आहे.
‘शहरातील वर्दळीचे ठिकाण असणारे सेह डोकान मशिदीत स्फोट झाला असून स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कमीत कमी 20 मृतदेह आणि 65 जखमींना अबू अली सिना बाल्खी रुग्णालयात दाखल झाले आहेत.’ अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मंगळवारी पश्चिम काबुलमधील एका हायस्कूलमध्ये तीन स्फोट झाले होते, ज्यात सहा जण ठार आणि 11 जखमी झाले होते. दोन दिवसांपूर्वी बल्ख प्रांतात प्रशिक्षण केंद्र आणि शाळेवर हल्ला करण्यात आलाआहे. यात दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मझार-ए-शरीफमधील तालिबान कमांडरचे प्रवक्ते मोहम्मद आसिफ वझेरी यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, “जिल्ह्यात शिया मशिदीत स्फोट झाला, 20 हून अधिक ठार आणि जखमी झाले.” अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.