एक अनोख कन्यादान, मुलाच्या निधनानंतर सासूने लावून दिले सुनेचे दुसरे लग्न

पुणे | सासू सुनेच्या भांडणाच्या चर्चा तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. या नात्याबद्दल समाजात अनेक समज- गैरसमज आहेत. काही घरात सुनेला मान मिळतो तर काही घरात सुनेला सासुरवास असल्याच्या घटना आपण पाहतो. पण पुण्यात (Pune) समाजात आदर्श निर्माण व्हावा अशी घटना घडली आहे. एका सासूच्याच्या पुढाकाराने विधवा सुनेचा पुनर्विवाह झाला आहे. छाया लायगुडे असे त्या आदर्श सासूचे नाव आहे.

छाया लायगुडे यांचा मोठा मुलगा विशाल लायगुडे याचे पाच ते सहा वर्षांपूर्वी दीर्घ आजाराने वयाच्या 32 व्या वर्षी निधन झाले. विशालच्या पश्चात त्याची आई, पत्नी रश्मी, आणि पाच वर्षांची मुलगी आहे. एवढ्या लहान वयात सुनेच्या वाट्याला आलेले एवढे मोठ दुःख त्यांनी जाणून घेतले. त्यामुळे सुनेच्या भविष्याचा विचार सासूच्या मनात घर करून होता. त्यामुळं छोटा मुलगा आणि रश्मीने दिलेला प्रतिसाद यामुळे रश्मी यांचा दुसरा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या या कामगिरीने सोशल माध्यमांवर कौतुक होऊ लागले आहे. सासू सुनेच्या नात्याचा अर्थच या कृतीने बदलून गेला आहे. विधवा सुनेचे कन्यादान जेव्हा सासू करते तो क्षण म्हणजे इतिहास घडवणारी नांदी आहे. हा विवाह सोहळा नुकताच पुण्यात झाला. सासूने सुनेचे कन्यादान करत आपल्या या कृतीतून आदर्श घालून दिला आहे.

Dnyaneshwar: