मुंबई – Navneet rana on President’s rule | महाराष्ट्रात सध्या मोठ्या राजकीय घटना घडताना दिसत आहेत. एकनाथ शिंदेंच्या गटाच्या बंडाचा आज पाचवा दिवस आहे. त्यामुळे नक्की पुढे काय होणार याकडे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागून आहे. मात्र अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गुंडांकडून शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या खऱ्या शिवसैनिकांच्या घरावर, कार्यालयावर हल्ले करण्याचा प्रकार महाराष्ट्रात सुरू असून यावर त्वरित आळा घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा देत राष्ट्रपती राजवट लागू करावी, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल त्यावेळी शिवसेनेचं दुकान बंद करणार असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे हे शब्द आठवावेत, असंही राणा म्हणाल्या.