खासदार राणांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा; म्हणाल्या…

औरंगाबाद : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. येत्या काही दिवसातच राज्यामध्ये विविध निवडणुका होणार असून राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. तर खासदार नवनीत राणा यांनी औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यामुळे राणा आणि शिवसेना वाद पुन्हा पिटला असल्याचं पाहायला मिळत आहे.

तसचं खासदार नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना आधी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादकरांना पाणी द्यावं मग सभेत जाऊन भाषण ठोकाव. असा टोला देखीलं राणा यांनी लगावला आहे. पुढे त्या म्हणाल्या मुख्यमंत्र्यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सभा घ्यायला वेळ आहे. सध्या राज्यात अनेक प्रश्न आहेत. माझ्या शहरामध्ये पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झालं आहे. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीही याचा पाठपुरावा घ्यायला पाहिजे होता. परंतु राज्य सरकार जर पाणी देवू शकत नसेल तर महानगरपालिकेने राज्याकडे आणि राज्याने केंद्राकडे अमृत योजनेसाठी प्रस्ताव पाठवावा असं खासदार म्हणून मी तिथे पाठपुरावा करत असल्याचं देखील त्यांनी सांगितल.

दरम्यान, जर मुख्यमंत्र्यांना फक्त सर्व आमदारांना मोठ- मोठ्या हॉटेल मध्ये ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर ५० हजार रुपये खर्च करण्यासाठी वेळ आहे. परंतु आमचे प्रश्न सोडवायला वेळ नाही तरी त्यांनी केवळ औरंगाबादमध्ये सभा घ्यायची म्हणून जाऊ नये तर पाण्याचा प्रश्नही सोडवावा असंही त्या म्हणाल्या आहेत.

Nilam: