खासदार संतोख सिंह यांचं निधन, भारत जोडो यात्रेत चालत असताना आला हृदयविकाराचा झटका

नवी दिल्ली | Santokh Singh Passed Away – सध्या काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) पंजाबमध्ये (Punjab) आहे. तसंच भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले काँग्रेस खासदार संतोख सिंह (MP Santokh Singh) यांचं निधन झालं आहे. या यात्रेत चालत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. त्यामुळे त्यांना तातडीनं फगवाडा येथील विर्क रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला.

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांच्यासोबत संतोख सिंह पदयात्रेत सहभागी झाले होते. मात्र, आचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे राहुल गांधींनी (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा थांबवली आणि तात्काळ हॉस्पिटलला रवाना झाले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

2014 आणि 2019 मध्ये संतोख सिंह यांनी जालंधर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. तसंच आता त्यांच्या निधनानं राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. यामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी ट्विट केलं की, “जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांच्या अकाली निधनानं मला खूप दुःख झालं आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.”

Sumitra nalawade: