मुंबई – Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. राज्यातील काही महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली. दरम्यान, इकडे महाराष्ट्रात नवीनच प्रकरण समोर आलं आहे. राष्ट्रवादी युवा कॉंग्रेसकडून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल शुभेच्छा देत आहेत.
श्रीकांत शिंदे हे सुपर सीएम झाल्याचा आरोप राष्ट्रवादी युवा कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. श्रीकांत शिंदे यांचा शासकीय निवास्थानच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला एक फोटो शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीत त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांचा कार्यभार चालवत आहेत असा आरोप केला आहे.
“मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानच्या कार्यालयात खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून राज्याचा कारभार पाहतात. त्यांना सुपर सीएम झाल्याबद्दल राष्ट्रवादी युवा कॉंग्रेसतर्फे सुभेच्छा देतो. कदाचित मुख्यमंत्री दिल्लीच्या दौऱ्यावर असतील किंवा दहीहंडी, गणपती महोत्सव अशा महोत्सवांत व्यग्र असल्यामुळे कदाचित त्यांनी आपल्या राज्याचा कारभार आपले चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे असा संशय आम्हाला येत आहे.” असं रविकांत वरपे यांनी म्हटलं आहे.
वरपे पुढे म्हणाले, “शेतकरी अतिवृष्टी आणि लम्पी आजारामुळे हवालदिल झाला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. त्यामुळे कदाचित त्यांनी आपल्या मुलाला या खुर्चीवर बसवलं असेल. या खुर्चीवर मुख्यमंत्री महत्वाच्या बैठका घेत असतात. त्यांच्या खुर्चीच्या मागे राजमुद्रेचा लोगो देखील असतो. त्या खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसेलेले आहेत.”