MPSC | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांत आयोगाने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कमाल संधींच्या किंवा प्रयत्नांच्या मर्यादा घातल्या होत्या. त्यामुळं परीक्षार्थींना निश्चीत वयोमर्यादेतही मर्यादित अटेंम्ट द्याव्या लागत होत्या. परंतु तो निर्णय आयोगाने रद्द केला आहे त्यामुळं MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षार्थींना देण्यात आलेली संधींची मर्यादा रद्द केली आहे. त्यामुळं निश्चित वयोमर्यादेत वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवारांना अमर्यादित वेळा परीक्षा देता येणार आहे. याबाबतची घोषणा आयोगाने बुधवारी केली आहे. MPSC च्या विद्यार्थ्यांकडून या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे.
डिसेंबर 2020 आणि ऑक्टोबर २०२१ मध्ये MPSC ने UPSC च्या धर्तीवर वयोमार्यादेबरोबर परीक्षा देण्याची कमाल मर्यादा देखील ठरवली होती, त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी सहा तर मागासवर्गातील उमेदवारांसाठी नऊ संधींची मर्यादा ठरवण्यात आली होती. आणि अनुसूचित जाती जमातीसाठी अशी मर्यादा नव्हती. मात्र आता MPSC कडून सुधरणा करण्यात आली आहे. नवीन निर्णयानुसार पूर्वीप्रमाणेच उमेदवारांना संधी देण्यात आल्या आहेत. त्यामुळं खुल्या प्रवर्गातील आणि मागासवर्गातील उमेदवारांसाठी हा निर्णय खूप फायद्याचा ठरणार आहे.