अखेर विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! MPSC चा मोठा निर्णय

MPSC Pattern : गेल्या काही महिन्यांपासून मुंबई MPSC चे नवीन नियम 2025 पासून लागू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षांच्या मुख्य परीक्षांसाठी वर्णात्मक पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यूपीएससीच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, विद्यार्थ्यांनी आंदोलन करत हा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याची मागणी केली होती. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू होणार आहे.

नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यात येणार असून दोन दिवसांत आपण बैठक घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्याचे पवार यांनी सांगितले होते. तसेच मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले असले तरी अधिकृत भूमिका येत नाही तो पर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतली होती. आमचे सरकार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत आहे आणि सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

Dnyaneshwar: