मुंबई | Mukhyamantri Kisan Yojana Will Be Implemented In Maharashtra – राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. शिंदे-फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. मागच्या तीन दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याच धर्तीवर राज्यात देखील मुख्यमंत्री किसान सम्मान निधी योजना राबवण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक महिन्यात टप्प्या टप्प्यानं रक्कम दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.
दरम्यान, राज्यात लवकरच मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या आर्थिक वर्षात बजेटमध्ये तरतूद देखील करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना वर्षाला या योजनेद्वारे सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. मात्र, ते कशा पद्धतीने देणार याबाबत आणखी माहिती मिळालेली नाही. लवकरच याबाबतचा निर्णय राज्य सरकारनं घेणार आहे.